पुणे : पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २ जानेवारी २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विशेष शिक्षण शिक्षक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेष शिक्षण शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे
– नोकरीचे ठिकाण : खडकी, पुणे
– वेतन / मानधन : दरमहा २४५००
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०२ जानेवारी २०२६ सकाळी 11:00 वाजता
– मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलच्या आवारातील स्वाभिमान केंद्र, खडकी, पुणे-४११००३.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kirkee.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


