Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Election 2026 : पुणेकरांसाठी ‘गेमचेंजर’ घोषणा! मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत, अजित पवारांचा मोठा प्लॅन

Pune Election 2026 : पुणेकरांसाठी ‘गेमचेंजर’ घोषणा! मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत, अजित पवारांचा मोठा प्लॅन

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा जाहीर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठी आणि धक्कादायक घोषणा केली आहे. पुण्यातील नागरिकांना मेट्रो आणि PMPML बसचा प्रवास पूर्णतः मोफत देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे दररोज सुमारे साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर खर्च होतात. वर्षाला हा खर्च तब्बल 10,800 कोटी रुपयांपर्यंत जातो. हा पैसा सार्वजनिक वाहतुकीवर खर्च केला तर मेट्रो आणि बस प्रवास मोफत करता येऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक वापरल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होईल, वाहतूक कोंडी सुटेल आणि पुणे प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“महापालिकेची सत्ता आमच्या हातात दिली तर मोफत मेट्रो योजना प्रत्यक्षात आणून दाखवू,” असे ठाम आश्वासन अजित पवार यांनी दिले. पुणे आमचं शहर आहे, पुणेकरांबद्दल आमचं विशेष आपुलकीचं नातं आहे, त्यामुळे पुणेकरांनी आम्हालाच संधी द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

संयुक्त जाहीरनाम्यात पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मालमत्ता कर सवलत, झोपडपट्टी पुनर्वसन आणि पर्यावरणपूरक विकास यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला असून, मोफत मेट्रो आणि बस प्रवास ही या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी ‘गेमचेंजर’ घोषणा मानली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!