Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prashant Jagtap Resignation: शरद पवारांना मोठा धक्का ! 27 वर्षांची साथ सोडली, प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीला रामराम

Prashant Jagtap Resignation: शरद पवारांना मोठा धक्का ! 27 वर्षांची साथ सोडली, प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीला रामराम

Prashant Jagtap Resignation: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, पुणे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट आणि शरद पवार गट) पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या हालचालींमुळे जगताप कमालीचे नाराज होते.

युतीच्या चर्चेतून बंडाचे निशाण

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका काबीज करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी असतानाच, प्रशांत जगताप यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे सुपूर्द केला आहे.

२७ वर्षांचा प्रवास, पण विचारांशी तडजोड नाही

पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त करताना जगताप म्हणाले, 27 वर्षांपूर्वी मी जेव्हा राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा पदासाठी नव्हे तर पुरोगामी विचारांच्या चळवळीसाठी आलो होतो. आजही माझे तेच ध्येय आहे. दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली माझ्या तत्त्वांना पटणाऱ्या नाहीत. २७ वर्षांच्या या प्रवासात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि संधी दिल्याबद्दल शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले.

हेही वाचा – ‘रशिया-युक्रेन युतीसारखं चित्र उभं करू नका…’; मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर खोचक टीका

निवडणूक लढवणारच; अपक्ष की नवा मार्ग?

प्रशांत जगताप यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी पुणे महानगरपालिकेची निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ते अपक्ष लढणार की एखाद्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत त्यांनी अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पुणे राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब

प्रशांत जगताप हे पुण्याच्या राजकारणातील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा मानले जातात. आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा हा शरद पवार यांच्या पक्षासाठी मोठा फटका मानला जात आहे. विशेषतः पुणे शहरात पक्षाची बांधणी करण्यात जगतापांचा मोठा वाटा होता, आता राजानाम्यामुळे पक्षांतर्गत गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!