Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजपच्या बड्या नेत्यांना न्यायालयाचा झटका ! नितेश राणेंसह ‘या’ 2 आमदारांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

भाजपच्या बड्या नेत्यांना न्यायालयाचा झटका ! नितेश राणेंसह ‘या’ 2 आमदारांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Nitesh Rane Arrest Warrant: कोरोना काळातील एका जुन्या आंदोलनप्रकरणी भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कुडाळ न्यायालयाने राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावले आहे. वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत कोर्टाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाशी संबंधित आहे. ‘संविधान बचाव’ आंदोलनादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे, निलेश राणे आणि राजन तेली यांच्यासह सुमारे 42 जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

गैरहजेरी पडली महागात

आज कुडाळ न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी माजी आमदार निलेश राणे आणि राजन तेली यांच्यासह इतर आरोपी न्यायालयात हजर होते. मात्र, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यासह इतर 5 जण गैरहजर राहिले. नितेश राणे मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वकिलांनी सादर केलेला माफीचा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आणि थेट अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला.

हेही वाचा – Vijay Wadettiwar: ‘मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे कटकारस्थान…’; वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा

दरेकर आणि लाड यांनाही दणका

केवळ नितेश राणेच नव्हे, तर याच आंदोलनाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेत आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनाही न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यांच्याविरुद्धही अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढील कारवाई काय?

अजामीनपात्र वॉरंट निघाल्यामुळे संबंधित नेत्यांना आता कायदेशीर पेचप्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी त्यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहून जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी लागेल, अन्यथा अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!