Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘रशिया-युक्रेन युतीसारखं चित्र उभं करू नका…’; मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर खोचक टीका

‘रशिया-युक्रेन युतीसारखं चित्र उभं करू नका…’; मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर खोचक टीका

Devendra Fadnavis on Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. ‘स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी दोन हतबल पक्ष एकत्र आले आहेत,’ अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अक्षरश: खिल्ली उडवली. माध्यमांनी या युतीचे केलेले उदात्तीकरण पाहून त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा मिश्किल दाखला दिला.

‘रशिया-युक्रेन एकत्र आल्यासारखा मीडियाचा आव’

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी या युतीच्या प्रसिद्धीवर उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, मी टीव्हीवर पाहत होतो, काही प्रसारमाध्यमे ही युती अशी दाखवत होती की जणू रशिया आणि युक्रेनमधील वैर संपून त्यांची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की आणि तिकडून पुतीन निघाले आहेत आणि त्यांची ऐतिहासिक भेट होत आहे, असा आभास निर्माण केला जातोय. पण वास्तव हेच आहे की, बुडणाऱ्या पक्षांना एकमेकांचा आधार घेण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.

हेही वाचा – Thackeray Alliance: ‘मराठी अस्मितेसाठी इंजिन आणि मशाल एकवटली’; 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर

फडणवीसांनी पुढे बोलताना म्हटलं की, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे पाप या मंडळींनीच केले आहे. ज्यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला, त्यांच्यासोबत आज कोणीही यायला तयार नाही. त्यांचा इतिहास केवळ भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा राहिला आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. निवडणुका आल्या की केवळ भावनिक बोलून लोकांना भुलवण्याचे दिवस आता संपले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

‘आणखी दोन-चार पक्ष घेतले तरी महायुतीच जिंकणार’

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांनी महायुतीचा विकास डोळ्यांनी पाहिला आहे. ठाकरे बंधूंनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर आणखी दोन-चार लहान पक्ष सोबत घेतले तरी मुंबईची जनता महायुतीच्या कामावरच मोहर उमटवेल. लोकांचा विश्वास आता केवळ ठोस विकासावर आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!