Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election 2026: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का! सचिन खरातांची निवडणुकीतून माघार

PMC Election 2026: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का! सचिन खरातांची निवडणुकीतून माघार

PMC Election 2026: महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय हादरा बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दिलेल्या तिकिटावरून निर्माण झालेला वाद आता वेगळ्या वळणावर पोहोचला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेण्याची घोषणा केली आहे.

सन्मान मिळाला नाही, विचारांशी तडजोड नको

अजित पवार यांच्यासोबत युती करण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता, असे सांगत सचिन खरात यांनी आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. “आम्ही सन्मानपूर्वक जागांच्या अपेक्षेने राष्ट्रवादीसोबत गेलो होतो, मात्र तशी वागणूक मिळाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा करून मी कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाही. राजकारणात दोन पावले मागे गेलो तरी चालेल, पण तत्त्व सोडणार नाही,” अशा कडक शब्दांत खरात यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी आता कोणत्याही उमेदवाराला आपला पाठिंबा नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – पुण्यात उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका! बंडखोरांसह अधिकृत उमेदवारही भाजपात; राजकीय घडामोडींना वेग

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारीवरून ‘खापर’ फोडण्याचे राजकारण

पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने काही कुख्यात टोळ्यांशी संबंधित सदस्यांना ‘एबी’ फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली होती. यावरून विरोधकांनी टीका झोडताच अजित पवारांनी ही जबाबदारी सचिन खरात यांच्यावर ढकलली होती. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला तिकीट दिले नाही, ते उमेदवार खरात गटाचे असून युतीमुळे त्यांना तो अधिकार होता, असे सांगत अजित पवारांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता सचिन खरात यांनीच अंग काढून घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची मोठी कोंडी झाली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत नवे वळण

सचिन खरात यांनी प्रक्रियेतून बाहेर पडल्यामुळे पुण्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेल्या राष्ट्रवादीला आता मित्रपक्षाने सोडलेली साथ महागात पडू शकते. या घडामोडींमुळे पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक अधिकच रंगतदार आणि संघर्षाची होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!