Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : कुणाचा आधार गेला, कुठे शाळकरी मुलांचा जीव धोक्यात; राज्यात अपघातांचे तांडव

Accident News : कुणाचा आधार गेला, कुठे शाळकरी मुलांचा जीव धोक्यात; राज्यात अपघातांचे तांडव

Accident News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून, गेल्या 24 तासांत घडलेल्या भीषण घटनांनी राज्य हादरलं आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला असून, दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. काही ठिकाणी कुटुंबांचा आधार हिरावला गेला, तर काही ठिकाणी निष्पाप मुलांचा जीव थेट धोक्यात आला आहे.

समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा-इसारवाडी महामार्गावर शिवपूर शिवारात कंटेनर आणि आयशर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

कंटेनरच्या धडकेत तरुणाचा अंत

छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरात बेजबाबदार कंटेनर चालकामुळे एका तरुणाचा जीव गेला. नारेगाव येथील शहाबाज कमरोद्दीन बागवान हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात शहाबाज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोखंडी पाईप केबिनमध्ये घुसले

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरात भीषण अपघात घडला. लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकचे नियंत्रण सुटून वाहन खड्ड्यात कोसळले. अपघातावेळी ट्रकमधील जड लोखंडी पाईप केबिन फाडून आत घुसल्याने चालक अनिसउद्दीन काझी आणि क्लीनर मोहम्मद रेहान यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

शाळकरी मुलांवर काळाचा घाला

पुणे जिल्ह्यातील मंचर-पुणे रस्त्यावर मालवाहू टेम्पोने दोन शाळकरी मुलांना धडक दिली. 12 वर्षीय चिराग गुजर आणि 13 वर्षीय क्रिश तेली हे टेम्पोच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. संतप्त जमावाने चालकाला चोप दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी मुलांवर सध्या ICU मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!