Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

Indapur: इंदापूर तालुक्यातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी आरती आबा कारंडे हिने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने साधलेले हे यश इंदापूर तालुका व चेतना कॉलेज ऑफ फार्मसीसाठी अभिमानास्पद ठरले आहे. पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित ‘शिष्यवृत्ती वाटप २०२५’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात आरती कारंडे हिचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बीव्हीजी ग्रुपचे डायरेक्टर हणमंतराव गायकवाड आणि तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक रवी घाटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेरणादायी वातावरणात आरतीस शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

यासोबतच, शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि मुलाखतीतील उत्कृष्ट कामगिरी या तीनही निकषांवर आरतीची निवड SOCIAL 100 FOUNDATION, पुणे या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठीही करण्यात आली आहे. “समाजाकडून समाजासाठी” या ब्रीदवाक्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या निवड प्रक्रियेत आरतीने मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणीदरम्यान आपल्या शैक्षणिक प्रवासातील प्रामाणिकता व ध्येयदृष्टी प्रभावीपणे मांडून परीक्षकांचा विश्वास संपादन केला.

हेही वाचा – इंदापूरमधील सरकारी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप; पत्रकार सुरेश जकातेंचा मृतदेह दीड तास शवविच्छेदन दाराशीच

आरतीच्या या यशाबद्दल चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अभिनंदन करताना सांगितले की, ‘विद्यार्थिनीचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षकांनी दिलेले योग्य मार्गदर्शन यांचा संगम म्हणजे हे यश आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा.’ चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनीही आरतीचे अभिनंदन केले. कॉलेजमधील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

हेही वाचा – ‘कर्मयोगी’चा अडचणीचा काळ संपला! उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखणार; हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास

आरतीच्या कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की, या शिष्यवृत्त्यांमुळे शिक्षणाची आर्थिक जबाबदारी हलकी झाली असून भविष्यात आणखी चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. आरती कारंडेचे हे यश केवळ वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या आगामी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!