Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘कर्मयोगी’चा अडचणीचा काळ संपला! उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखणार; हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास

‘कर्मयोगी’चा अडचणीचा काळ संपला! उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखणार; हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास

Karmayogi Sugar Factory: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना आणि सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, चालू गळीत हंगामासाठी रु. ३३५० प्रति टन असा उच्चांकी ऊस दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात दरवर्षी उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली जाईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली)चे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

महात्मा फुलेनगर (बिजवडी), ता. इंदापूर येथे कारखाना कार्यस्थळी आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर जाहीर केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा शेतकरी सभासद व ऊस तोडणी–वाहतूक ठेकेदारांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.

हेही वाचा – कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर – हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील म्हणाले, कारखान्याच्या उभारणीपासूनच अनेक अडचणी आल्या. २०१२ मध्ये चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही राजकीय अडथळे निर्माण झाले; मात्र गेल्या ११ वर्षांत राजकीय पाठबळ नसतानाही कारखाना सक्षमपणे उभा राहिला आहे. सध्याची परिस्थिती बदलली असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जविषयक धोरणांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. ८ टक्क्यांदराने कर्ज देत असताना जिल्हा बँक ११ ते ११.३० टक्के व्याज का आकारते, असा सवाल उपस्थित होतो. नीरा भीमा कारखान्याच्या इथेनॉल कर्जाबाबतही अडवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.

इंदापूर बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आणि अन्य संस्थांबाबत केलेल्या कामांचा आढावा देत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच साखरेचा दर प्रति किलो रु. ४१ करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्य व देशातील साखर उद्योगाच्या समस्या व भविष्याबाबतही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, सहयोग तत्त्वावर कारखाना चालविण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा अभ्यास मोठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस पुरवठा केल्यास अधिकाधिक दर देऊ, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी पक्ष द्वेषाने काम करतो, त्यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही’; हर्षवर्धन पाटीलांची टीका

भाग्यश्री पाटील यांनी उच्चांकी ऊस दर दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचे अभिनंदन केले. नीरा भीमा कारखान्याचे चालू हंगामात ७ लाख मेट्रिक टन, तर कर्मयोगी कारखान्याचे १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी दोन्ही कारखान्यांना ऊस देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. राघव व्यवहारे, राजेंद्र पवार, निलेश देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, ठेकेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्र्यांनी दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही?

कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखान्यांच्या माध्यमातून दिवाळीला शेतकऱ्यांना रु. १०० प्रति टन प्रमाणे ऊस बिलाची रक्कम देण्यात आली. मात्र कृषीमंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्याद्वारे दिवाळीला ऊस बिल का दिले नाही, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!