Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Politics : अजित पवार-उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीची मोहोर; दौंड नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत

Pune Politics : अजित पवार-उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीची मोहोर; दौंड नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीत स्थानिक समीकरणे जुळवली गेली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी युती केली आहे. ही युती नागरिक हित संरक्षण मंडळ या स्थानिक आघाडीशी मुख्य लढत देण्यासाठी झाली आहे.

भाजपने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस काही जागांवर एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत चुरशीची आणि रंगतदार लढत अपेक्षित आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी काही ठिकाणी काडीमोड घेत महाविकास आघाडीतील पक्षांसोबत युती केल्या आहेत. दौंडसारखीच ही स्थानिक पातळीवरील सोईची युती आहे. सदस्यपदाच्या २६ जागांपैकी एका जागेवर शिवसेना (ठाकरे गट) ला उमेदवारी देण्यात आली आहे. नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून, १३ प्रभागातून २६ सदस्य निवडले जाणार आहेत.

डिसेंबर २०१६ च्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. त्या वेळी २४ सदस्यांपैकी राष्ट्रवादीच्या चिन्हावर १२ आणि शिवसेनेच्या चिन्हावर २ सदस्य निवडून आले होते. युती असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेच्या हेमलता परदेशी यांना उपनगराध्यक्षपद दिले, मात्र दुसऱ्या नगरसेविका अनिता गणेश दळवी यांना मात्र कार्यकाळ संपेपर्यंत संधी दिली नाही.

त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला ५ जागा दिल्या होत्या, त्यापैकी दोन जागांवर पक्षचिन्हावर विजय मिळाला होता. प्रभाग क्र. ३-क मध्ये शिवसेनेच्या भाग्यश्री पळसे आणि नागरिक हित मंडळाच्या पूजा गायकवाड-सारनोत यांना समसमान मते मिळाली होती, ईश्वरी चिठ्ठीने पूजाला विजयी घोषित केले गेले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!