Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये

अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये

पुणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या (अँटी-ड्रग टास्क फोर्स) कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. अमली पदार्थांचा बेकायदा व्यापार थांबविण्याबरोबरच केंद्र तसेच विविध राज्यांच्या संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम हे कृती दल करणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हे टास्क फोर्स विशेषतः राज्यभर व्याप्ती असलेल्या प्रकरणांचा तसेच आंतरराज्य टोळ्यांच्या कारवायांचा तपास करणार आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी शारदा राऊत यांची या टास्ट फोर्सच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. तर, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील हे टास्क फोर्सचे उपप्रमुख असतील. सरकारने फेब्रुवारीत या टास्क फोर्ससाठी ३४६ पदे मंजूर केली आहेत, ती राज्य पोलीस दलातून भरली जाणार आहेत. काही दिवसांतच या टास्क फोर्सचे काम सुरू होणार आहे. त्याच्या पुणे आणि नागपूर येथील विभागीय मुख्यालयांत पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख असतील.

टास्क फोर्सच्या पुणे विभागात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांचा, तर नागपूर विभागात मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश असेल. स्थानिक पोलिसांची अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरूच राहील, पण मोठी व्याप्ती असलेली प्रकरणे महासंचालकांच्या सूचनेनुसार टास्क फोर्सकडे सोपविली जातील.

उद्देश काय

अमली पदार्थविषयक गुन्ह्यांचा तपास, खटले दाखल करणे, गुन्हेगारांचा लेखाजोखा ठेवणे, केंद्र आणि अन्य राज्यांच्या यंत्रणांशी समन्वय ठेवणे तसेच लोकांमध्ये जनजागृती ही कामे हा टास्क फोर्स करणार आहे.

मुंबईत कार्यक्षेत्र नाही

या टास्क फोर्सच्या कार्यक्षेत्रातून मुंबई वगळली आहे. कारण मुंबई राज्याची राजधानी असल्याने तेथे आधीच राज्याचे अँटी नार्कोटिक्स सेल आणि केंद्राचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, कस्टम, डीआरआय यांचे काम सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!