Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात मोठा लक्झरी कार कर्ज घोटाळा; ईडीची 12 ठिकाणी धाड

पुण्यात मोठा लक्झरी कार कर्ज घोटाळा; ईडीची 12 ठिकाणी धाड

पुणे: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने पुण्यामध्ये मोठी कारवाई केल्याचं समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या युनिव्हर्सिटी रोड शाखेत झालेल्या १९.३८ कोटी रुपयांच्या लक्झरी कार कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये ईडीने बनावट कागदपत्रांचा वापर करून खरेदी केलेल्या आणि फसव्या कर्जाच्या पैशातून मिळालेल्या अनेक उच्च दर्जाच्या लक्झरी कार देखील जप्त केल्यात आहेत.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार ईडीने मंगळवार ते बुधवार, २६ नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील १२ निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापेमारी केली. ईडीने ही चौकशी CBI ACB, पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या FIR च्या आधारे सुरू केली. ज्यामध्ये 2017–2019 दरम्यान एसबीआयच्या युनिव्हर्सिटी रोड शाखेत चीफ मॅनेजर असलेल्या अमर कुलकर्णी यांनी ऑटो लोन काउन्सलर आदित्य सेठिया आणि काही निवडक कर्जदारांसोबत संगनमत करून बँकेची फसवणूक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे कार लोन मंजूर करण्यात आले, असा आरोप होता.

ईडीच्या तपासात उघड झाले की अनेक आरोपींनी बनावट दस्तऐवजांचा वापर करून आलिशान कार कर्ज घेतले आणि बँकेची कोट्यवधींची फसवणूक केली. यासाठी चीफ मॅनेजर अमर कुलकर्णी यांनी बँकेच्या लेंडिंग पॉलिसीकडे दुर्लक्ष करून हे लोन शिफारस केली. बँकेत बनावट आणि वाढीव रकमेची कोटेशन्स सादर करण्यात आली, जेणेकरून लोनची रक्कम जास्त दाखवता येईल आणि चुकीच्या पद्धतीने मंजुरी मिळू शकेल.

कार कर्ज घोटाळा उघडकीस..
अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही पडताळणी न करता मोठ्या रकमेची कर्जे मंजूर करण्यात आली. या कर्ज घोटाळ्यामध्ये बीएमडब्लू, वोल्वो, मर्सिडीज, रेंज रोव्हर अशा गाड्या खरेदी केल्याचं समोर आले आहे. या गाड्या घेण्यासाठी बनावट दस्तऐवजांचा वापर झाला आणि बँक अधिकाऱ्यांची संगनमत स्पष्ट झाली.

दरम्यान, या कारवाईत अनेक कर्जदारांनी खरेदी केलेली जमीन आणि इतर मालमत्ता, तसेच इतर आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात इनक्रिमिनेटिंग दस्तऐवज, खोटी कोटेशन्स, फर्जी कागदपत्रे आणि इतर नोंदीही आढळून आल्यात. हे सर्व PMLA कलम 17 अंतर्गत जप्त करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!