Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘हे प्रसाद नाही, जेवण आहे’; शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

‘हे प्रसाद नाही, जेवण आहे’; शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Shirdi Prasadalay Controversy: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना, संस्थानतर्फे दिला जाणारा प्रसाद “मुळात जेवण असून त्याला प्रसाद म्हणणे चुकीचे आहे,” असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. पोळी, भात, वरण आणि मिठाई असलेले भोजन प्रसादाच्या स्वरूपात देण्याची ही पद्धत अयोग्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुजय विखे यांनी यापूर्वीही शिर्डीत मद्यधुंद अवस्थेत स्वतःला साईभक्त म्हणवत फिरणाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर मोठी टीका होत असतानाच आता त्यांच्या नव्या विधानाने पुन्हा वादाला तोड फुटलं आहे.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले?

महापालिकेच्या प्रचार सभेत बोलताना सुजय विखे म्हणाले, “प्रसाद म्हणजे लापशी आणि घुगऱ्या, तेच परंपरेने मान्य आहे. पण इथे पोळी, भात, वरण, मिठाई दिली जाते. हा प्रसाद कसा झाला? हे स्पष्टपणे जेवणच आहे. माझा हॉटेल व्यवसाय चालावा म्हणून मी याला विरोध करत नाही, पण प्रसादाच्या नावाखाली जे चाललंय ते चुकीचं आहे.” यापुढे ते म्हणाले, “रात्री दारू पिऊन ‘साईभक्त’ म्हणून जे येतात ते भक्त नाहीत. तेच भिकारी, गुन्हेगार इथे आश्रय घेत होते. जेवायचं, झोपायचं आणि सकाळी उठून पळायचं, अशी त्यांची सवय झाली आहे. हे थांबलेच पाहिजे. जेव्हा शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडले, तेव्हा लोकांनीच मान्य केलं की मी जे बोलत होतो ते खरं होतं.”

हेही वाचा –संगमनेरमध्ये नवं समीकरण! थोरात-विखे संघर्ष पुन्हा पेटला; मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात?

याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत

साई संस्थानच्या मोफत जेवण योजनेला विरोध करताना सुजय विखे यांनी यापूर्वी “राज्यातील भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत जमा झाले आहेत” असे विधान केले होते. या वक्तव्यावर त्या वेळी विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता नव्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!