Pune Accident News : पुणे शहरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील दरी पुलावर अनेक चारचाकी आणि मोठी वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.
साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची एकामागोमाग धडक झाल्याने मोठा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहने पूर्णपणे चक्काचूर झाली आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अचानक ब्रेक लागणे, वेग किंवा कमी दृष्यमानता यामुळे ही साखळी धडक झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


