Today बुधवार, 4th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Election 2026: पुण्यात भाजपने उघडले खाते; मंजूषा नागपूरेंची बिनविरोध निवड

Pune Election 2026: पुण्यात भाजपने उघडले खाते; मंजूषा नागपूरेंची बिनविरोध निवड

Pune Election 2026 : भारतीय जनता पक्षाने निवडणूकी आधीच पुण्यात खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३५ (ब) मधील उमेदवार मंजूषा नागपूरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. नागपूरे यांच्यासह या प्रभागात सहा उमेदवारांचे अर्ज होते. त्यातील दोन अर्ज छाननीत बाद झाले होते. त्यानंतर चार अर्ज शिल्लक होते.

त्यातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात मागील दहा वर्षांपासून त्या सातत्याने कार्यरत असून नागपूरे यांचे पती दिपक नागपूरे हे भाजपचे सरचिटणीस आहे.

या प्रभागात शहरात सर्वाधिक कमी अर्ज आले होते. तर, उर्वरीत उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात भाजपला यश आले असल्याने नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!