Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election Result: पुण्यात भाजपचा ‘प्रभाग 10’ मध्ये डंका! रुपाली पवार यांच्यासह पूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

PMC Election Result: पुण्यात भाजपचा ‘प्रभाग 10’ मध्ये डंका! रुपाली पवार यांच्यासह पूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विरोधकांना धूळ चारत निर्भेळ यश संपादन केले आहे. यामध्ये भाजप उमेदवार रुपाली सचिन पवार यांनी 23649 मतांनी दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या संपूर्ण पॅनलने मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आहे.

प्रभाग 10 मधील भाजपचा ‘क्लीन स्वीप’

प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपने आपले चारही उमेदवार निवडून आणत विरोधकांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. या विजयात किरण दगडे पाटील यांनी सर्वाधिक 29211 मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या सोबतीने अल्पना गणेश वरपे यांनी 28216 मते मिळवली, तर दिलीप तुकाराम वेडेपाटील यांना 24734 मतदारांनी कौल दिला. रुपाली सचिन पवार यांनी 23649 मते मिळवत भाजपचा विजय निश्चित केला. या विजयामुळे प्रभाग 10 मध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा – PMC Election Result: पुण्यात ‘तात्यां’ना मोठा धक्का! वसंत मोरे यांच्यासह चिरंजीव रुपेश मोरेंचाही दारुण पराभव

स्वतंत्र लढूनही भाजपची मुसंडी

पुणे महानगरपालिकेच्या एकूण 41 प्रभागातील 162 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांच्या बहुमताची आवश्यकता असताना, महायुतीमधील घटक पक्ष स्वतंत्र लढूनही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती होता, मात्र आता मतदारांनी पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधींना कौल दिला आहे.

विरोधकांच्या युतीला मतदारांचा नकार

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवत होते. तसेच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप देखील एकमेकांच्या विरोधात उभे होते. अशा चौरंगी आणि अटीतटीच्या लढतीतही भाजपने पुण्यात आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. प्रभाग 10 मधील हा ‘क्लीन स्वीप’ भाजपसाठी सत्तेच्या समीकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!