Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी अपडेट.. ! अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी; ADRच्या अनुषंगाने तपासाचे आदेश

मोठी अपडेट.. ! अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी; ADRच्या अनुषंगाने तपासाचे आदेश

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी (२८ जानेवारी) झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधनानंतर आता या घटनेच्या तपासाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणाचा तपास एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) च्या अनुषंगाने केला जाणार असून, फॉरेन्सिक पथकाने आधीच घटनास्थळावरून आवश्यक नमुने तपासासाठी गोळा केले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता बारामती एटीसीच्या संपर्कात आले होते. दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र पायलटला रनवे स्पष्ट दिसत नसल्याचे त्यांनी कळवले.

बारामती विमानतळावर ILS सुविधा नसल्याने मॅन्युअल लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. दाट धुके, टेबल-टॉप रनवे आणि दुसऱ्या लँडिंग प्रयत्नादरम्यान विमानाचा तोल गेल्याने ते रनवेच्या बाजूला कोसळले. आदळताच मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आणि बचावकार्य अडचणीत आले. अपघाताचे अंतिम कारण DGCA अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!