Maharashtra Weather Update : राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत पारा ७-९ अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ७ दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून येत्या २४ तासात किमान तापमान २ ते ३ अंशांनी घटणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ७ ते ९ अंशावर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ५ दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.
– अहिल्यानगर: ९.३
– जळगाव: ९.७
– नाशिक: ९.५
– धाराशिव: १०.४
– परभणी: ११
– महाबळेश्वर: १२
– छत्रपती संभाजीनगर: १२
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत गारठा कायम राहील, तर नाशिक-जळगाव भागांत शीतलहरीचा फटका बसू शकतो. कोकणात हवामान कोरडे राहील, विदर्भात फारसा बदल नाही.
उत्तर भारतातील (पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश) कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडत आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, सकाळी धुके आणि गारठा जाणवेल.


