Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी केला आयुष्याचा शेवट; देहूत शोककळा

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी केला आयुष्याचा शेवट; देहूत शोककळा

पुणे: संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शिरीष महाराज हे शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शिरीष महाराजांनी घरात गळफास घेत आयुष्य आपलं संपवलं आहे. या घटनेमुळे देहू परिसरात एकच शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न ठरले होते. संत तुकाराम महाराजांचे ते ११ वे वंशज होते. शिरीष महाराजांनी घेतलेल्या निर्णयामुळे देहूत खळबळ माजली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.

शिरीष महाराज नेहमीप्रमाणे रात्री जेवल्यानंतर झोपायला गेले होते. मात्र, सकाळी त्यांच्या खोलीचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शिरीष महाराज यांचा २० दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. येणाऱ्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होते. मात्र, त्याआधीच त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!