Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अ‍ॅक्शन मोडवर, माढ्यातून कमबॅक करण्याच्या तयारीत

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अ‍ॅक्शन मोडवर, माढ्यातून कमबॅक करण्याच्या तयारीत

माढा: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा सेट बॅक बसला. अनेक महत्त्वाच्या जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापैकी माढा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभवही पक्षाच्या आणि स्वतः नाईक-निंबाळकर यांच्या जिव्हारी लागला आहे. माढ्यातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मैदानात उतरून त्याच ताकदीने कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण-खटाव आणि फलटण या विधानसभा मतदारसंघापैकी माण खटाव, फलटण, सांगोला या मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती तर माढा, करमाळा आणि माळशिरसमधून विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुक झाल्यापासून नाईक निंबाळकर यांनी होमपीच असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालून रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवाराचा पराभव करून आपल्या विचारांचा आमदार फलटणमधून निवडून आणला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात पुन्हा संघटनात्मक बांधणी करून या भागात झालेली पिछाडी भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून यांनी फिल्डींग लावली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातही त्यांनी लक्ष घातले असून शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेत्यांना गळ घातली आहे. त्याचबरोबर अॅड शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे-पाटील हे दोन माजी आमदार ही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याचे सध्या दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!