पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत त्याच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देवीदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
या समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉ. प्रवीण येवले काम पाहणार आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भातील वस्तुस्थितीसमोर येणार आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी तसे पत्र काढले आहे.
मोझे महाविद्यालयातील प्राध्यापक व त्याच्या साथीदारांनी परीक्षा झालेल्या उत्तरपत्रिका स्ट्रांग रूममधून काढून रात्री पुन्हा विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्या.
या समितीत वायदंडे यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, प्राचार्य डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.


