पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आज (१८ जून) पासून सुरुवात होत आहे. आज पालखीचे देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज संस्थानाने केली आहे. यादरम्यान, देहूतून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांच्या जवळ ड्रोन पडल्याची घटना घडली आहे. ड्रोन पडल्यानंतर पोलिसांनी तो तातडीने जप्त केला आहे. यामुळे परिसरात काही वेळ एकच गोंधळ उडालेला दसून आला.
दरम्यान, आषाढी वारी निमित्ताने देहूमध्ये ड्रोनद्वारे व्हिडिओ शूट केले जात आहेत. विविध दृश्य चित्रीत केली जातात असताना ही घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना हा ड्रोन त्यांच्या शेजारी पडला. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी ड्रोन तातडीने जप्त केला आहे.


