Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे. मात्र पालघर आणि किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट वातावरण जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह समुद्रकिनारी पट्ट्यात आकाश निरभ्र राहील आणि दुपारनंतर उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण :
कोकण विभागात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून थंडावा कमी जाणवेल. सकाळच्या वेळी काही भागात हलकं धुके दिसू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
या विभागात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे वातावरण कोरडं राहील, मात्र सकाळी काही ठिकाणी धुके तर दुपारनंतर उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
विदर्भ :
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही सध्या कोणताही हवामान इशारा नसून कोरडं वातावरण अपेक्षित आहे.
एकूणच, राज्यात पावसाची शक्यता नसून सकाळी धुके आणि दुपारी उन्हाचा तडाखा अशी स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


