Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवडचा कौल भाजपच्या बाजूने! विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, अजित पवारांना थेट धक्का

पिंपरी-चिंचवडचा कौल भाजपच्या बाजूने! विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, अजित पवारांना थेट धक्का

पिंपरी-चिंचवड : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जनतेने भाजपाला भरभरून पाठिंबा दिल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे, जळगाव, धुळे, ठाणे, पनवेल यांसह अनेक महापालिकांमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.

मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अत्यंत अटीतटीच्या लढतीनंतर अखेर भाजप-शिंदे गटाच्या महायुतीने ११८ जागांवर विजय मिळवत अनेक वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवली. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, नांदेड महापालिकेतही पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीत अजित पवारांनी महायुतीपासून फारकत घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचा मोठा फटका त्यांच्या पक्षाला बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या अजित पवारांच्या प्रभावक्षेत्रात भाजपाने दमदार कामगिरी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात थेट राजकीय संघर्ष रंगला होता. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उघडपणे महेश लांडगेंची पाठराखण केली होती.

निकालांमध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी स्पष्टपणे भाजपच्या बाजूने कौल दिला. महेश लांडगे यांनी या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावत भाजपाला मोठा विजय मिळवून दिला.

या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भाजपाला छप्पर फाड पाठिंबा दिला आहे. हा कौल म्हणजे विकास आणि स्थिर नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे हा विजय अजित पवारांसाठी थेट राजकीय संदेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!