Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Daund Accident News : आईच्या डोळ्यादेखत चार वर्षांचा आर्यन रोड रोलरखाली चिरडला; दौंडमधील हृदयदावक दुर्घटना

Daund Accident News : आईच्या डोळ्यादेखत चार वर्षांचा आर्यन रोड रोलरखाली चिरडला; दौंडमधील हृदयदावक दुर्घटना

Daund Accident News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक अत्यंत हृदयदावक घटना घडली असून, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान चार वर्षांचा आर्यन जाधव हा चिमुकला रोड रोलरखाली सापडून मृत्युमुखी पडला आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात, सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील दौंड-गोपाळवाडी रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यनची आई याच कामावर मजूर म्हणून कार्यरत होती. काम सुरू असताना आर्यन हा आईच्या पाठीमागे चालत होता. त्याच वेळी रोड रोलर मागे घेत असताना चालकाच्या लक्षात न आल्याने आर्यन थेट रोलरखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. अपघातानंतर रोड रोलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, डांबरीकरण सुरू असताना संबंधित विभागाने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला नव्हता. तसेच कोणतेही सूचना फलक, सुरक्षात्मक कठडे किंवा आवश्यक सुरक्षितता उपाय करण्यात आले नव्हते. काम लवकर उरकण्याच्या नादात रोलरचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

आईच्या डोळ्यादेखतच पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने रस्ते कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!