पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा मूळ सहा हजार २५६ कोटी ३९ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह नऊ हजार ६७५ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्याकडून प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे यावेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडकरांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवाढीपासून दिलासा मिळाला आहे. प्रशासकानी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत यामध्ये कोणतीही करवाढ आणि दर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- विकास कामांसाठी एक हजार ९६२ कोटी ७२ लाख
- आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १३८ कोटी १२ लाख रुपये
- शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी रुपये
- स्थापत्य विशेष योजना ७५३ कोटी ५६ लाख रुपये
- महिलांच्या विविध योजनासाठी ८३ कोटी
- दिव्यांग कल्याणकारी योजनासाठी ६२ कोटी नऊ लाख रुपये,
- पाणी पुरवठा विशेषनिधी ३०० कोटी


