Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Railway: पुणेकरांसाठी खूशखबर! 60 नव्या गाड्या अन् 6 नवे प्लॅटफॉर्म…; काय आहे रेल्वेचा मास्टर प्लॅन?

Pune Railway: पुणेकरांसाठी खूशखबर! 60 नव्या गाड्या अन् 6 नवे प्लॅटफॉर्म…; काय आहे रेल्वेचा मास्टर प्लॅन?

Pune Railway: पुणेकरांच्या रेल्वे प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली असून, स्थानकाच्या विस्तारीकरणाचा एक महत्त्वाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. या योजनेनुसार, पुणे स्थानकावर ६ नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार असून, गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता थेट दुप्पट होणार आहे.

पुणे स्थानकाचा असा असेल नवा चेहरा

सध्या असलेल्या फलाटांची लांबी वाढवण्यासोबतच ६ नवीन फलाट (प्लॅटफॉर्म) बांधले जातील. सध्या पुण्यावरून ५० गाड्या सुटतात. पुढील पाच वर्षांत ही संख्या ११० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच तब्बल ६० नवीन गाड्या पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील. सध्या धावणाऱ्या ७५ गाड्यांना १९८ जादा डबे जोडले जातील, ज्यामुळे दररोज २० हजार अतिरिक्त प्रवाशांना जागा उपलब्ध होईल. या सर्व बदलांमुळे सुमारे दीड लाख प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल आणि वेटिंग लिस्टची समस्या कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – Double-Decker Flyover: विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! पुण्यातील पहिला डबल डेकर पूल ‘या’ दिवशी वाहतुकीसाठी खुला होणार

सॅटेलाइट टर्मिनल्सवर भर

पुणे स्थानक परिसरात जागेची कमतरता लक्षात घेता, प्रशासनाने शहराच्या बाजूला दोन सॅटेलाइट स्थानके विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आळंदी, उरुळी आणि फुरसुंगी येथे ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ उभारले जातील. यामुळे मुख्य पुणे स्थानकावरील गाड्यांचा ताण कमी होईल आणि उपनगरातील प्रवाशांना तिथूनच गाडी पकडणे सोपे जाईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील ज्या ४८ प्रमुख स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचे निश्चित केले आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूरचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळे पुणे केवळ शैक्षणिक किंवा आयटी हब न राहता, रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही देशातील एक प्रमुख केंद्र ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!