Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: दौंडमध्ये शालेय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; प्रदर्शनाची तयारी करत असताना आले अन्… संतापजनक प्रकार

Pune News: दौंडमध्ये शालेय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; प्रदर्शनाची तयारी करत असताना आले अन्… संतापजनक प्रकार

Pune News: पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगावमध्ये एका शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शाळेत आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रशांतकुमार हरिश्चंद्र गावडे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थिनीसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न…

१८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी शाळेत प्रदर्शनाची तयारी करत होती. याचवेळी आरोपी शिक्षक ज्या ठिकाणी विद्यार्थिनी होती त्या रूममध्ये आला आणि आपण दोघे मिळून या स्पर्धेचे नंबर ठरवू असं म्हणत या विद्यार्थिनीशी त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शेजारील बाकावर बसून पीडितेचा उजवा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले असा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.

याप्रकरणी दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!