Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Santosh Deshmukh Murder Case: नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले न्यायालयात कोसळला! सुनावणीदरम्यान न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा

Santosh Deshmukh Murder Case: नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले न्यायालयात कोसळला! सुनावणीदरम्यान न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने गुरुवारी न्यायालयात नाट्यमय वळण घेतले. बीड न्यायालयात सकाळी ११ वाजता या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली, जिथे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद मांडला. सुनावणीवेळी मृताचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. मात्र, आरोपी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या राजकीय संबंधांवर बोट ठेवत त्यांना या खटल्यातून हटवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला.

हेही वाचा – मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

सुदर्शन घुलेला न्यायालयात चक्कर

या अर्जावर निकम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत तो फेटाळण्याची विनंती केली. याच दरम्यान, आरोपी सुदर्शन घुले याचे नाव पुकारले जाताच तो न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. दुसरीकडे, आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरही खडाजंगी झाली. चाटेचे नाव सुरुवातीच्या एफआयआरमध्ये नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला, तर तो सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असून त्याने आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा प्रतिदावा सरकारी पक्षाने केला.

हेही वाचा – वाल्मिक कराडला मोठा झटका! संतोष देशमुख हत्या प्रकरणात हायकोर्टाने जामीन फेटाळला

आरोप निश्चिती नाहीत?

सुनावणीत पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरूनही मोठे वादंग झाले. आरोपींच्या वकिलांनी घटनेचे व्हिडिओ मिळावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चित व्हावेत, अशी मागणी केली. तसेच, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील मूळ डेटा लॅपटॉपमध्ये घेऊन डिलिट केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर घडामोडींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही आरोप निश्चिती होऊ शकलेली नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!