Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी राडा; डॉक्टर महिलेचा विनयभंग

Pune News: पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी राडा; डॉक्टर महिलेचा विनयभंग

पिंपरीचिंचवड : पिंपरीचिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात शिरून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच ३३ वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात भाजपचे कार्यकर्ते घुसले. तक्रारदार महिलेची जाऊ या प्रभागातून निवडणूक लढवत असून, प्रचार आटोपून तक्रारदार महिला रात्री सुमारे दहा वाजता घरी परतल्या होत्या. आरोपी हे विरोधी पॅनलमधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्ते असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, रात्री १२.१५ च्या सुमारास पिंपरी गावात आरोपी जमले. स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश करत तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. “आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं धाडस केलंस, जीवे मारून टाकू,” अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. तसेच दिराला धक्काबुक्की, आजीसासूंना ढकलणे, दुचाकी वाहनांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून, प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे…. आणखी वाचा

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!