K Annamalai: मुंबईच्या अस्मितेवरून तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आणि ठाकरे बंधूंमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. ‘मला मुंबईत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा,’ अशा शब्दांत अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना त्यांनी ‘मूर्ख’ संबोधल्याने या राजकीय संघर्षात आता नवी ठिणगी पडली आहे.
काय आहे अण्णामलाईंचे स्पष्टीकरण?
मुंबई महाराष्ट्राची नाही, या त्यांच्या कथित विधानावर सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले, आपण पंतप्रधान मोदींना भारताचे नेते म्हणतो, म्हणजे ते गुजराती नाहीत का? कामराज यांना देशाचे नेते म्हणतो, म्हणजे ते तामिळ नाहीत का? तसेच, मुंबईला ‘जगाची राजधानी’ म्हणणे म्हणजे ती मराठी माणसाने उभारली नाही असा अर्थ होत नाही. मुंबई ही मराठी बांधव आणि भगिनींच्या अपार कष्टातूनच उभी राहिली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा – Raj Thackeray : ‘इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू’; महायुतीवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
‘सामना’च्या धमकीला प्रत्युत्तर
‘सामना’मधून मिळालेल्या पाय तोडण्याच्या धमकीवर अण्णामलाई संतापले आहेत. “मी अशा धमक्यांना आणि दहशतीला घाबरणारा माणूस नाही. जर घाबरलो असतो, तर गावी घरातच बसून राहिलो असतो. मी मुंबईत येणारच आहे, काय करायचे ते करून घ्या,” असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले.
Two people are roaming around with no real work to do Raj Thackeray and Aaditya Thackeray.
I have immense respect for Balasaheb Thackeray When I was the Tamil Nadu BJP president one of the photographs displayed in my office was that of Chhatrapati Shivaji Maharaj
Just like… pic.twitter.com/75JJzuDEqv
— Army of Dheeran Annamalai (@annamalai_chap2) January 12, 2026
ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवताना म्हटले की, दोन्ही भावांकडे सध्या कोणतेही ठोस काम नसल्याने ते इकडे-तिकडे फिरून विधाने करत आहेत. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे, पण आज जर ते जिवंत असते, तर या लोकांकडे (ठाकरे बंधूंकडे) कोणतेही राजकीय स्थान उरले नसते. हे लोक केवळ वडिलांचा वारसा संपवण्याचे काम करत आहेत.


