Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात भोंदू बाबाकडून आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक; ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा दावा करून लुटली आयुष्यभराची कमाई

पुण्यात भोंदू बाबाकडून आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक; ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा दावा करून लुटली आयुष्यभराची कमाई

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भोंदू बाबाने आणि त्याच्या साथीदारिणीने शहरातील आयटी इंजिनियर दिपक डोळस आणि त्यांच्या शिक्षक पत्नीची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेने आयटी क्षेत्र आणि पुण्यातील उच्चवर्गीय समाज हादरला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिपक खडके नावाचा भोंदू बाबा आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांनी “शंकर महाराज माझ्या अंगात येतात आणि ते आजार बरे करतात” असा दावा करत डोळस दाम्पत्याला जाळ्यात ओढले. त्यांच्या दोन मुलींच्या आजारावर उपाय म्हणून खडके आणि वेदिकाने ‘दैवी आदेश’ सांगून डोळस कुटुंबाकडून एकामागोमाग एक मालमत्ता विकायला लावल्या.

इंग्लंडमधील घरासह सर्व मालमत्ता विकायला लावली

दिपक डोळस काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. तिथले घर, फार्महाऊस आणि पुण्यातील फ्लॅटसुद्धा तुमच्यावर दोष आहेत या कारणावरून विकायला भाग पाडण्यात आले. या सर्व विक्रीतून आलेला पैसा आरटीजीएसद्वारे राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आला.

हेही वाचा – Pune Cyber Crime: सायबर चोरीची आणखी एक घटना; सीबीआय कारवाईची भीती दाखवून जेष्ठ महिलेची 1 कोटी 19 लाखांची फसवणू

एकमेव घरही तारण ठेवायला लावलं

जेव्हा मुलींची प्रकृती सुधारली नाही, तेव्हा डोळस दाम्पत्याने दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी ‘तुमच्या घरात दोष आहे’ असे सांगून शेवटचे राहिलेले घरही तारण ठेवून लोन काढण्यास भाग पाडले. पर्सनल लोन घेऊन दिलेला पैसा सुद्धा आरोपींनी अपहार केला आणि त्या पैशातून कोथरुड येथील महात्मा सोसायटीमध्ये आलीशान बंगला खरेदी केल्याचा आरोप आहे.

२०१८ पासून सुरू होता संपूर्ण प्रकार

ही फसवणूक २०१८ पासून सुरू होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. दिपक डोळस, त्यांच्या पत्नी आणि दोन मुली या सर्वांना अनेक वेळा खडके-पंढरपुरकर यांच्या दरबारात बोलावून दैवी आदेश सांगितले जात होते. प्रत्येक वेळी नवे कारण सांगून डोळस कुटुंबाकडून मोठी रक्कम वसूल केली गेली. या प्रकरणावर पोलिसांकडून गंभीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फसवणुकीची रक्कम आणि मालमत्तेचा मागोवा घेतला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!