Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई! 2 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ

Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई!  2 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या चर्चित पोर्शे दुर्घटनेनंतर पोलीस विभागात मोठी हालचाल झाली आहे. या प्रकरणातील चौकशीत निष्काळजीपणा आढळल्याने येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ मे २०२४ रोजी एका अल्पवयीन मुलाने अतिवेगात असलेल्या पोर्शे कारने धडक दिल्यामुळे दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतरच्या तपासात आवश्यक ती माहिती वेळेवर वरिष्ठांकडे पोहोचवण्यात त्रुटी झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

याशिवाय, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले यांना देखील जबाबदारी न पाळल्याबद्दल दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागत आहे. या दोघांना पुढील पाच वर्षे मूळ वेतनावरच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचूनही त्यांनी घटनेची माहिती कंट्रोल रूममध्ये नोंदवली नव्हती, ज्यामुळे अपघाताची गंभीरता रात्री ड्युटीवरील वरिष्ठांकडे पोहोचण्यात उशीर झाला.

हेही वाचा –Sangli News: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् ट्रॅक्टर उलटून तरुण ठार; मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचा अपघात

अपघाताची पार्श्वभूमी

कोरेगाव पार्कमध्ये 19 मे 2024 च्या रात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेत पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या अभियंते अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना जबर धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी कार चालवणारा मुलगा अवघा १७ वर्षे ८ महिने वयाचा होता. तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात सिद्ध झाले.

हेही वाचा – पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुचं; स्कूल बस अन् कारची धडक

अपघातानंतरची धांदल

सुरुवातीला या प्रकरणात ‘निष्काळजीपणे वाहन चालवणे’ असा किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अल्पवयीन चालकाने दारू प्राशन केले होते, हे समोर आल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य वाढले. या घटनेत बाल न्याय मंडळाने 14 तासांत चालकाला जामीन दिला. ज्यामध्ये आरोपीला फक्त 100 शब्दांचा निबंध लिहिणे, समाजसेवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशा हलक्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर प्रकरण अधिकच गाजले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!