पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी लष्कर, डेक्कन आणि कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ पहाटे ५ वाजेपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
याशिवाय, रात्री १२ वाजेपर्यंत शहरात जड वाहनांना प्रवेश बंद आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
बंद राहणारे मुख्य रस्ते
- महात्मा गांधी रस्ता (MG रोड) : १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकादरम्यान पूर्ण बंद.
- फर्ग्युसन कॉलेज रोड : गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत बंद.
- जंगली महाराज रस्ता (JM रोड) : झाशीची राणी चौकातून प्रवेश बंद.
- बाबासाहेब आंबेडकर रस्ता आणि अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद.
- व्होल्गा चौक ते महंमद रफी चौक बंद.
- इंदिरा गांधी चौक ते महावीर चौक बंद.
या पर्यायी मार्गाचा करा वापर
- कोथरूड/कर्वे रस्त्याकडून येणारी वाहने : खंडुजीबाबा चौकात थांबवून विधी महाविद्यालय रस्ता → प्रभात रस्ता → अलका चित्रपटगृहाकडे वळवले जातील.
- झाशीची राणी चौकाकडून JM रोडकडे : बंद.
पर्यायी मार्ग : गोखले स्मारक चौक → उपरस्ते → पुणे महापालिका भवन → ओंकारेश्वर मंदिर → छत्रपती शिवाजी महाराज रस्ता. - वाय जंक्शनकडून MG रोडकडे : १५ ऑगस्ट चौकात बंद.
पर्यायी मार्ग : कुरेशी मशीद → सुजाता मस्तानी चौक. - इस्कॉन मंदिराकडून लष्कर/MG रोडकडे : सायंकाळी ५ नंतर बंद.
- व्होल्गा चौक ते महंमद रफी चौक : बंद.
पर्यायी मार्ग : ईस्ट स्ट्रीट → इंदिरा गांधी चौक. - इंदिरा गांधी चौक ते महावीर चौक : बंद.
पर्यायी मार्ग : लष्कर पोलीस ठाण्याकडे. - सरबतवाला चौक ते महावीर चौक : बंद (पर्यायी मार्ग स्थानिक पोलिसांकडून सूचित).


