Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘युवकांनी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे’;राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर समारोप समारंभात डॉ. संजीव सोनवणे यांचे प्रतिपादन

‘युवकांनी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे’;राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर समारोप समारंभात डॉ. संजीव सोनवणे यांचे प्रतिपादन

इंदापूर : प्रतिनिधी

कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर तसेच श्रीमती रत्नप्रभादेवी महाविद्यालय बावडा यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर दिनांक 9 जानेवारी 2026 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या ठिकाणी पार पडले. या हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेचा उद्देश तसेच युवकांची समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट केली तसेच देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

शिबिर काळात केलेल्या कामाचे कौतुक 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी केले. शिबिर काळात केलेल्या कामाची माहिती त्यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍड. मनोहर चौधरी उपस्थित होते, त्यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी शिबिर काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी माजी सभापती विलासराव वाघमोडे, संचालक सुरेश मेहेर, बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे, इंदापूर महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे, डॉ.शिवाजी वीर डॉ. भरत भुजबळ, सरपंच राधिका गोसावी,माणिक खाडे उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक स्वयंसेविका यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शिबीर काळात केलेल्या कामाचा अहवाल मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

या शिबिर काळात शहाजी नगर या गावाची स्वच्छता करण्यात आली तसेच वृक्षारोपण, पथनाट्यातून जनजागृती, गावाचे भौगोलिक,आर्थिक सर्वेक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. तसेच स्वयंसेवकांच्या माध्यमातून सलग समतल चर याची बांधणी करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने, डॉ. महम्मद मुलाणी, प्रा. प्रशांत साठे प्रा.नामदेव पवार, प्रा. नम्रता निंबाळकर, प्रा. प्रकाश करे, प्रा. सचिन आरडे, बंडू राऊत, अशोक पवार, संतोष खाडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले तर आभार प्रा.अमोल मगर यांनी मानले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!