Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भिगवणमध्ये किलोच्या आतील कार्प मासे खरेदी-विक्रीवर बंदी; धरणातील मत्स्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वूपर्ण निर्णय

भिगवणमध्ये किलोच्या आतील कार्प मासे खरेदी-विक्रीवर बंदी; धरणातील मत्स्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वूपर्ण निर्णय

भिगवण: शासनाने उजनी जलाशयात सोडलेल्या प्रमुख कार्प जातीच्या एक किलोच्या आतील मासे खरेदी-विक्रीवर बंदीचा निर्णय भिगवण येथील मासळी बाजारातील आडतदार व होलसेल व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जलसंपदा विभागाने बंदी घातलेल्या वडाप व पंड्याच्या जाळ्यावर कारवाईचे सत्र चालू केले आहे. याच वेळी आडतदार व व्यापाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेले उजनी जलाशय सध्या बेकायदेशीर (अवैध) मासेमारीमुळे धोक्यात आले आहे. केवळ चिलापी, थाय मांगूर, सकर माशांचे सर्वत्र साम्राज्य पसरले आहे. धरणातील चवदार मासे दुर्मिळ व नष्ट झाले आहेत. रोजगारनिर्मिती व घटलेले मत्स्य उत्पादन पूर्ववत होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धोरणात्मक निर्णय घेत २०२४ पासून उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे संवर्धन होण्यासाठी कोणत्याही आकाराचे वडाप, पंड्याने मासेमारीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीदेखील मुजोर फिशमाफिया मत्स्यबीज व लहान मासे मारून त्याच्या तस्करीचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही.

दरम्यान, इंदापूर व भिगवण या मासळी खरेदी-विक्रीच्या सर्वांत मोठ्या बाजारातदेखील रोहू, कटला, मृगल जातींचे लहान मासे विक्रीसाठी आणले जातात. ही बाब लक्षात घेऊन भिगवण आडतदार व व्यापाऱ्यांनी असे लहान मासे खरेदी किंवा विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक किलोच्या आतील रोहू, कटला, मृगल जातींचे मासे मारणे कायद्याने गुन्हा असल्याने व मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी असे मासे कोणीही खरेदी अथवा विक्री केल्यास संबंधित विभागाकडून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!