Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर एसटीची रिक्षाला धडक; समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याचा प्रयत्न, 4 जण जखमी

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर एसटीची रिक्षाला धडक; समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याचा प्रयत्न, 4 जण जखमी

Pune Accident: अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मंचर गावच्या हद्दीत मोरडे कॅडबरी कंपनीसमोर सकाळी पावणे सात वाजता झाला. अपघातात समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसची रिक्षाला धडक बसली. यात रिक्षातील 4 जण जखमी झाले आहेत. एसटी बस मधील 40 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव एसटी आगाराची नारायणगाव ते पुणे ही एसटी बस ही पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी समोरच्या बाजूने एक गाडी ओव्हरटेक करून वेगाने पुढे आली. या गाडीला वाचवण्यासाठी एसटी बस चालक पोपट गोरख झंझड याने एसटी बस उजव्या बाजूला घेतल्याने समोरून येणारी रिक्षा आणि एसटीची धडक बसली. अवसरी येथून रिक्षा मधून चार जण मंचर येथे निघाले होते. या अपघातात रिक्षातील दीक्षा येलभर, रंजना शिंदे, दीपक विरनक, विकास येलभर हे जखमी झाले आहे. एसटी बसमध्ये 40 प्रवासी होते ते सुदैवाने बचावले आहे. एसटीच्या डाव्या बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे.

अपघातामध्ये रिक्षाचेही नुकसान झाले असून चारही जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास येलभर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मंचर आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, वाहतूक नियंत्रण सलील सय्यद, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जनार्दन शिंगाळे यांनी प्रवाशांना मदत केली. त्यांना एसटी वाहनांमध्ये बसून पुढे रवाना करण्यात आले. या संदर्भात एसटी चालक पोपट गोरख झंजाड यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कारचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!