Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत दाखल; मात्र भाजपची नाराजी

माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत दाखल; मात्र भाजपची नाराजी

पुणे : कसब्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी या प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. २०१७च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत धंगेकर यांनी माजी आमदार मोहन जोशी यांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर कसब्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय संपादन केला होता.

वर्षभरापूर्वी पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक धंगेकर यांनी काँग्रेसकडून लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यातही ‘ते पराभूत झाले होते. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत शिंदे यांच्याकडे संपर्क साधला होता. त्यानुसार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकर यांचा हा चौथा पक्षप्रवेश आहे. ते शिवसेनेत आल्याने कसबा भाजपाची गोची झाली आहे.

महायुतीच्या कार्यक्रमात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आता धंगेकरही असणार आहेत. त्यामुळे कसब्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील धंगेकरांकडून झालेला पराभव भाजप पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लागला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!