Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरलं! प्रेयसीचं लग्न दुसरीकडे ठरल्यानं प्रियकराचा हल्ला; उपचारादरम्यान २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

पुणे हादरलं! प्रेयसीचं लग्न दुसरीकडे ठरल्यानं प्रियकराचा हल्ला; उपचारादरम्यान २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्रियकराने चाकूने सपासप वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणीचे नाव उजालादेवी दोहरे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि उजालादेवी हे दोघेही पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली होती. काही दिवसांपूर्वी उजालादेवी तिच्या मूळ गावी गेली असता तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवले.

ही माहिती मिळताच आरोपी संतापला. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तो थेट तरुणीच्या चंदननगर येथील घरी पोहोचला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने चाकूने तिच्या गळ्यावर व शरीरावर वार केले.

गंभीर जखमी अवस्थेत उजालादेवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप राठोडला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!