Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Mayor: पुण्याचा नवा ‘कारभारी’ ठरला! कोणाच्या गळ्यात पडली महापौरपदाची माळ

Pune Mayor: पुण्याचा नवा ‘कारभारी’ ठरला! कोणाच्या गळ्यात पडली महापौरपदाची माळ

Pune Mayor: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या महापौरपदाच्या सस्पेन्सवर अखेर पडदा पडला आहे. अनुभवी चेहऱ्याला संधी देण्याच्या धोरणानुसार, भारतीय जनता पक्षाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नावावर अंतिम मोहोर उमटवली असून, यामुळे इच्छुकांच्या शर्यतीत असलेल्या इतर नावांना धक्का बसला आहे.

चुरशीची शर्यत
महापौरपदासाठी भाजपच्या कोअर कमिटीने वर्षा तापकीर, मानसी देशपांडे आणि मंजुषा नागपुरे या तीन अनुभवी नगरसेविकांच्या नावांची शिफारस केली होती. या तिघीही चौथ्यांदा निवडून आल्याने स्पर्धा अटीतटीची होती. सुरुवातीला वर्षा तापकीर यांचे नाव आघाडीवर असताना, अंतिम क्षणी भाजपने नागपुरे यांच्या नावाला पसंती देऊन राजकीय वर्तुळात धक्कातंत्राचा वापर केला आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला प्रथमच शहराचे प्रथम नागरिकपद भूषवण्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे, नागपुरे या यंदा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

निवड बिनविरोध होणार?
पुणे महापालिकेत सध्याचे संख्याबळ पाहता, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी उमेदवार न उतरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड केवळ औपचारिकता उरण्याची शक्यता आहे.

बैठकीत झाले निर्णय
सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पुण्यातील कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला होता. ९ फेब्रुवारीला आवाजी मतदानाने ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुणे शहराला अधिकृतपणे नवे महापौर मिळतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!