Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC News : पुणे महापालिकेचा गोंधळ; 12 वर्षे रिकामा महापौर बंगला, तरीही दुरुस्तीसाठी 46 लाख खर्च

PMC News : पुणे महापालिकेचा गोंधळ; 12 वर्षे रिकामा महापौर बंगला, तरीही दुरुस्तीसाठी 46 लाख खर्च

PMC News : पुणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवाजीनगर येथील महापौर निवासस्थान गेली 12 वर्षे रिकामे असतानाही त्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी तब्बल 45.91 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, ही प्रक्रिया नियमित निविदा न काढता कोटेशन पद्धतीने पार पडल्याने वाद निर्माण झाला आहे. तातडीच्या तरतुदीचा आधार घेत हे काम देण्यात आले असून यावरून प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे.

महापौरांच्या निवासासाठी बांधलेला हा बंगला अनेक वर्षांपासून वापरात नाही. येथे केवळ बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटींसाठीच अधूनमधून उपयोग केला जातो. त्यामुळे एवढ्या मोठ्या खर्चाची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापौरांची निवड झाल्यानंतर बंगल्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया गतीने राबवण्यात आली. यामध्ये रंगकाम, फर्निचर नूतनीकरण, छत दुरुस्ती, पॉलिश आणि स्वच्छतागृह दुरुस्ती यांसारख्या कामांचा समावेश आहे.

दरम्यान, एका ठेकेदाराने 38.70 लाख रुपयांचे सर्वात कमी कोटेशन दिल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. जीएसटी आणि इतर खर्च धरून एकूण रक्कम 45.91 लाखांपर्यंत जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महापौर या बंगल्यात राहत नसताना एवढा मोठा खर्च करण्याचे औचित्य काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून या निर्णयावरून महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!