पुणे : राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) संशयित आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता ११ झाला आहे. मात्र, यातील केवळ ४ रुग्णांना जीबीएसचे निदान झाल्याचे निश्चित झाले आहे. तर, इतर ७ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर, २११ रुग्णांपैकी आतापर्यंत १४४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील १८३ रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे. ३६ रुग्ण आयसीयूमध्ये आणि १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, बुधवारी नव्याने एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) दोन मृत्यू झाले असून या मृतांमध्ये बारामतीमधील एक २६ वर्षीय मुलीचा समावेश असून, तिच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू होते. तर दुसरा मृत्यु पिंपरी-चिंचवडमध्ये झाला आहे. दरम्यान, बुधवारी नवीन बाधित रूग्णसंख्या नाही. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत २११ जीबीएसबाधित रुग्णांपैकी पुणे शहर आणि जिल्ह्यात ४२ रुग्ण पुणे पालिका कार्यक्षेत्रातील आहेत. तर, सर्वाधिक रुग्णसंख्या ९४ ही समाविष्ट गावांतील आहे.


