Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Lift Accident: पुणे हादरलं! केबल तुटून लिफ्टचा भीषण अपघात; तळेगाव दाभाडेत तरुणाचा हृदयद्रावक अंत

Pune Lift Accident: पुणे हादरलं! केबल तुटून लिफ्टचा भीषण अपघात; तळेगाव दाभाडेत तरुणाचा हृदयद्रावक अंत

Pune Lift Accident: तळेगाव दाभाडे येथील ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या दिनेश सुरंगे या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लिफ्टची मुख्य केबल तुटली आणि उंचावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेशचा जागीच मृत्यू झाला असून, याप्रकरणी सोसायटीच्या ११ पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बचावकार्य सुरू असतानाच काळाचा घाला
ही घटना सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान घडली. दिनेश लिफ्टमध्ये असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक अडकली. सोसायटीतील रहिवासी त्याला धीर देत बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. “घाबरू नकोस, आम्ही तुला सुखरूप बाहेर काढतो,” असे रहिवासी ओरडून सांगत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. लिफ्टची लोखंडी केबल तुटल्याने लिफ्ट वेगाने खाली आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दिनेशला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

सोसायटी पदाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात
दिनेशच्या मृत्यूला व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. लिफ्टच्या देखभालीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत वाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. चेअरमन पुंडलिक वारके यांच्यासह दीपक हेंद्रे, विनायक खोराटे, नीलेश गवळी, प्रवीण श्रीवास अशा एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लिफ्टची नियमित तपासणी (AMC) वेळेवर झाली होती का? आणि रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

रहिवाशांचा संताप: “आवाज येत होता, पण लक्ष दिले नाही”
या घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लिफ्टमधून विचित्र आवाज येत असल्याची तक्रार अनेकदा करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून बहुमजली इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!