Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic Updates : पुणे शहर ९ तास ‘सायकल’स्वारांच्या ताब्यात! ग्रँड चॅलेंज टूरमुळे प्रमुख रस्ते बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Pune Traffic Updates : पुणे शहर ९ तास ‘सायकल’स्वारांच्या ताब्यात! ग्रँड चॅलेंज टूरमुळे प्रमुख रस्ते बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Pune Traffic Updates : पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे मंगळवार, १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील प्रमुख रस्ते तब्बल ९ तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

या स्पर्धेतील प्रोलॉग रेस पुणे शहरात होणार असून, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रोड तसेच त्यांना जोडणारे सर्व उपरस्ते पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलीस वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.

प्रोलॉग स्पर्धेचा मार्ग खंडोजी बाबा चौक – गुडलक चौक – तुकाराम महाराज पादुका चौक – ललित महल चौक – चाफेकर चौक – रेंज हिल्स – सिमला ऑफिस चौक – संचेती चौक – बालगंधर्व चौक – डेक्कन जिमखाना बस स्थानक असा असणार आहे. या संपूर्ण मार्गावर नो-पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना, “ही स्पर्धा पुण्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारी आहे. ती आपलीच स्पर्धा समजून सहकार्य करा,” असे म्हटले आहे.

दरम्यान, २३ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्पर्धेचा आणखी एक टप्पा होणार असून, त्या दिवशीही टप्प्याटप्प्याने वाहतुकीवर निर्बंध असतील. या टप्प्याची सुरुवात बालेवाडीतून होऊन समारोप जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौकात होणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!