Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election: पुण्यात खळबळ! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला ‘या’ पक्षाकडून उमेदवारी

PMC Election: पुण्यात खळबळ! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला ‘या’ पक्षाकडून उमेदवारी

PMC Election: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात पुण्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. युती आणि जागावाटपाचा घोळ अद्याप सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून देण्यात आलेल्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाची मोठी खेळी

कुख्यात गुंड गजा मारणे सध्या कोथरूड मारहाण प्रकरणी कारागृहात असला, तरी त्याच्या पत्नी जयश्री मारणे आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. अजित पवार गटाने त्यांना प्रभाग क्रमांक १० मधून अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) जाहीर केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीने केलेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच, राष्ट्रवादीने मारणे यांच्या पत्नीला तिकीट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच गुंड आंदेकर गटानेही निवडणुकीत उडी घेतल्याने पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Kalyan Dombivli Election : कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा तिढा सुटला; कोण किती जागा लढवणार?

युतीचा तिढा कायम; अर्जासाठी काही तासच शिल्लक

पुण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ‘एबी फॉर्म’चे वाटप प्रलंबित असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!