Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं वाटपाचा गंभीर आरोप

नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं वाटपाचा गंभीर आरोप

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युतीचे चित्र स्पष्ट असले तरी जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. शिंदे गटाने २० ते २५ जागांची मागणी केली असली तरी भाजपकडून फक्त १५ जागांची ऑफर मिळाल्याने नाराजी वाढली आहे. यातच शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

नाराज शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, तिकीट वाटप कमर्शियल पद्धतीने होत आहे. पक्षाच्या नेत्यांनी पैसे घेऊन तिकीटे देण्याचे ठरवले असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, नीलम गोऱ्हे भाजपच्या सांगण्यावरूनच वागत असल्याने शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोपही केला गेला.

इच्छुक उमेदवारांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत काम केलेल्या कार्यकर्त्यांचे अहवाल गोळा केले जातात, पण ते पाहिलेच जात नाहीत. ग्रामीण भागातील नेते विजय शिवतारे यांना पुणे शहराची माहिती नसतानाही ते निर्णय घेतात आणि भाजपच्या उमेदवारांच्या संख्येनुसार तिकीटे ठरवली जातात. “भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का? आम्हाला ताकद देण्याऐवजी खच्चीकरण करत आहात का?” असा सवालही उपस्थित केला गेला.

यावेळी कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यांच्यावर प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून कमर्शियल पद्धतीने तिकीट वाटपाचा आरोप करताना म्हटले की, गोऱ्हे राहत असलेल्या भागात आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला नाही, कारण त्यांनी पक्ष वाढू दिला नाही.

जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने शिंदे सेनेतील नाराजी वाढली असून, युती टिकेल की नाही याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना असे अंतर्गत वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!