Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रवादीतून हकालपट्टी होताच शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरेंना ऑफर!

राष्ट्रवादीतून हकालपट्टी होताच शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरेंना ऑफर!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांना वगळल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अजित पवारांच्या गटाने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर लगेचच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठोंबरे यांना खुली ऑफर दिली आहे. ‘रूपाली माझी चांगली मैत्रीण आहे. ती स्वच्छ प्रतिमेची, निर्भय आणि मुद्द्यांवर बोलणारी महिला आहे. जर ती आमच्या शिवसेनेत यायचं ठरवलं, तर आम्ही तिचं मनापासून स्वागत करू,’ असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

अंधारे यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘रूपाली ठोंबरे ही ईडी-सीबीआयच्या भीतीशिवाय, स्वच्छ प्रतिमेची महिला आहे. ती कुठल्याही पक्षात गेली तरी तिचं स्वागत होणारच. पण माझ्या पक्षात यावी म्हणून मी इतर पक्षात तिचं नुकसान व्हावं, असा विचार करणारी नाही.’

दरम्यान, अजित पवार गटाने जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना वगळण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा वाद चांगलाच चिघळला होता. या वादाचा फटका अखेर ठोंबरे यांना बसल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – Rupali Patil Thombare : रुपाली पाटील-ठोंबरे, अमोल मिटकरींची उचलबांगडी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर!

रूपाली ठोंबरे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं, मात्र त्यानंतरही त्यांना यादीत स्थान मिळालं नाही. उलट, वादग्रस्त मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या सुरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात अस्वस्थता पसरली असून, ठोंबरे यांच्या पुढील राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफरमुळे या नाट्यमय वादाला आता नवा ट्विस्ट मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!