Today रविवार, 2nd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Leopard Attack: अंधारात फोनवर बोलणं पडलं महागात! नारायणगावमध्ये 18 वर्षांच्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला

Leopard Attack: अंधारात फोनवर बोलणं पडलं महागात! नारायणगावमध्ये 18 वर्षांच्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला

Leopard Attack: जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. बुधवारी रात्री नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एक तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, तनिष नवनाथ परदेशी (वय १८) हा तरुण रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास साकार नगरी सोसायटीजवळ फोनवर बोलत उभा होता. मोबाईलमध्ये गुंग असलेल्या त्या तरुणाला आजूबाजूच्या धोका जाणवत नव्हता, आणि याचवेळी बिबट्याने अचानक झेप घेतली. हल्ल्यात तनिषच्या पायाला मोठी दुखापत झाली. मात्र तो मोठ्या अपघातापासून वाचला. हल्ल्यानंतर तनिषला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा – ओतूर येथे बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव

परिसरात तीन बिबटे आढळले

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ड्रोन पाहणीनुसार, घटनास्थळापासून केवळ २०० फूट अंतरावर वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात तीन बिबटे आढळले. सदर परिसरात बिबट्यांनी मागील दिवशीच चार पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – Pune School: बिबट्यामुळे पुण्यातील ‘या’ शाळांच्या वेळा बदलल्या; काय आहे कारण आणि नवीन वेळ?

जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ

वन विभागाने वाढत्या धोके लक्षात घेऊन परिसरात आठ पिंजरे लावले आहेत, तसेच नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर न जाण्याचा आणि बिबट्या आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांत जुन्नर तालुक्यातील ओतूर, शेटेवाडी, शिवनेरी आणि नारायणगाव भागात बिबट्यांचे हल्ले वाढल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!