Teachers Summer Vacation : राज्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाळांना २ मे २०२६ पासून ते १४ जून २०२६ पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असली तरी, शिक्षकांना या कालावधीत पूर्ण सुट्टी मिळणार नाही. भारत सरकारच्या जनगणना २०२७ च्या तयारीअंतर्गत शिक्षकांना घरगणना आणि यादी तयार करण्याचे काम सोपवले जाणार आहे.
– शाळा बंद: २ मे २०२६ ते १४ जून २०२६ (विदर्भात काही ठिकाणी १३ जून किंवा नंतर शाळा सुरू).
– शाळा पुन्हा सुरू: १६ जून २०२६ पासून (काही ठिकाणी २५ जूनपर्यंत).
जनगणना ड्यूटीचे कारण
भारताची जनगणना २०२७ दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान सुरू होईल. महाराष्ट्रात हा टप्पा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता, सुविधा इत्यादींची माहिती गोळा केली जाईल.
शिक्षकांची भूमिका काय?
– शिक्षकांना मुख्यालय सोडू नये, असे आदेश असून, ते गावोगावी/क्षेत्रात राहून काम करतील.
– १६ मे २०२६ पासून सुरू होऊन १४ जूनपर्यंत घरगणना, घरांची यादी तयार करणे आणि संबंधित कामे करावी लागतील.
– जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने शिक्षकांना (एन्यूमरेटर म्हणून) ड्यूटी लावली जाणार आहे. प्रशिक्षणही याच कालावधीत होईल.
– यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर पूर्ण गंडांतर येणार आहे.
या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोष असून, सुट्टी रद्द होण्याची चर्चा आहे. अधिकृत शासन आदेश किंवा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून लवकरच स्पष्ट निर्देश अपेक्षित आहेत. शिक्षकांनी आपल्या मुख्यालयात राहून जनगणना काम पूर्ण करावे, असे सांगण्यात येत आहे.


