Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हिंजवडीत अंगवाडी सेविका अन् मदतनीसांचा अजब प्रताप! 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं

हिंजवडीत अंगवाडी सेविका अन् मदतनीसांचा अजब प्रताप! 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं

Pune News: हिंजवडीतल्या आयटी पार्कलगत असलेल्या अंगणवाडी केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वीस बालकांना आत कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. व्हिडिओत अंगणवाडीतील लहान मुलं भीतीने रडत असल्याचे दृश्य दिसताच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. हिंजवडी येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये कार्यरत सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

मुलांना कोंडून ठेवण्यामागील धक्कादायक कारण

ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही अंगणवाडीला कुलूप लावले आणि मुलांना आतच ठेवले, अशी कबुली दोन्ही कर्मचाऱ्यांनी दिली असल्याचे समजते. हा प्रसंग बुधवारी (ता. २६) सकाळी अकरा ते बारा या वेळेत घडला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी लगेच याबाबत माहिती मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना दिली. तत्काळ कारवाई करत गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून ताबडतोब केंद्राचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – पुणेकरांसाठी खुशखबर! खराडी ते खडकवासला आणि नळ-स्टॉप ते माणिक बाग मेट्रो मार्गाला मंजुरी

घटनेमुळे संतापाचा उद्रेक

अगदी काही वेळासाठीसुद्धा एवढ्या लहान मुलांना कुलूप लावून बंदिस्त ठेवणे किती भयावह ठरू शकते, याची जाणीव व्हिडिओतील रडण्याच्या आवाजातून स्पष्ट जाणवते. मुलांची भीती आणि अस्वस्थता पाहून पालकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या गंभीर दुर्लक्षाबाबत बाल विकास विभाग कोणती कार्यवाही करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमके काय घडले?

माजी सरपंचांच्या बोलावणीवरून बैठकीसाठी निघण्यापूर्वी सेविका आणि मदतनीस यांनी वीस लहानग्यांना अंगणवाडीतच बंद करून त्याला कुलूप लावले, असा आरोप व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार समोर आला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कुलूप उघडण्यात आले, मात्र या गंभीर निष्काळजीपणामुळे अंगणवाडी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणानंतर पालकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!